वडगाव मावळ :- प्रवीण देशमुख निर्मित/लिखित/दिग्दर्शित आशिया खंडातील नामांकित महानाट्य “मराठ्यांची गौरवगाथा” या महानाट्यातून प्रेरणा घेऊन कुसगाव (लोणावळा) येथील शिवप्रेमी लक्ष्मण नामदेव केदारी यांनी त्यांच्या घरगुती गणपतीला हालता देखावा सादर केला आहे.
महानाट्यात दाखविल्या प्रमाणे आनंदी गाव, पठाणांचे आक्रमण, शिवजन्म, स्वराज्याची शपथ, न्यायनिवाडा,अफजलखान वध, पावनखिंड लढाई, शाहिस्तेखानाची फजिती, सिंहगड लढाई, शिवराज्याभिषेक सोहळा असा संपूर्ण शिवरायांचा जीवनपट दाखवण्यात आला आहे, विशेष म्हणजे संपूर्ण केदारी कुटुंबाने मिळून देखाव्याची निर्मिती केली आहे. ही बाब संपूर्ण मराठ्यांची गौरवगाथा परिवारासाठी अभिमानास्पद आहे असे वक्तव्य निर्मात्यांनी केले आहे,
केदारींनी मागीलवर्षी देखील उरी येथील सर्जिकल स्ट्राईक हा देखावा सादर करून मावळ तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. यंदा मराठ्यांची गौरवगाथा एक महानाट्य हा देखावा गणेश भक्तांचे आकर्षण ठरत आहे




