पिंपरी : मुंबई येथील नेहरू तारांगणच्या पार्श्वभूमीवर पिपरी चिंचवड शहरामध्ये ११ कोटी रुपये खर्च करून तारांगण बांधण्यात आले आहे. आकाशगंगा, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, सूर्य, पृथ्वी यांच्या अभ्यासासाठी विद्याच्यांना याचा उपयोग होणार आहे. ऑप्टो मेकॅनिकल आणि २ डी डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून आकाशातील ग्रहताऱ्यांचा अनुभव घेता न्यावा, यासाठी तारांगण तयार झाले आहे. मात्र, जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने त्याचे उद्घाटन रखडलेले आहे.
खगोलशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी व बच्चे कंपनीला आकाशातील ग्रहताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी शहरामध्ये तारांगण असावे अशी संकल्पना २०१७ मध्ये पुढे आली. त्यासाठी मार्च २०१८ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्कच्या बाजूला तारांगण उभारण्याचे काम सुरू झाले. जपान टोकिओ येथील ठेकेदाराने या प्रकल्पाचे काम केले आहे या कामासाठी १० महिन्यांची मुदत हजार रुपये खर्च झाला आहे.
दरम्यान, प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यास विलंब झाला. त्यानंतर झाल्याने दोन महिन्यांपूर्वीच त्याचा आलेल्या कोरोना महामारीमुळे काम उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आणखी लांबले. जून महिन्यामध्ये कामासाठी तब्बल तीन वेळा मुदतवाढ तत्कालीन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देण्यात आली. अजित पवार यांच्या हस्ते तारांगणचे उद्घाटन होणार होते.
मात्र, महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यामुळे उद्घाटन रद्द झाले. सद्यस्थितीत शिंदे गट व भाजप यांचे सरकार आहे. सरकार स्थापन करून अडीच महिने उलटूनही अद्याप जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला नाही. त्यामुळे तारांगणचे उद्घाटन रखडले आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.




