पुणे : बावनकुळे म्हणाले जेव्हा संघटना मजबूत होत असतं तेव्हा संघर्ष करण्याची ताकद निर्माण होते. त्यानंतर भलेभले गड उद्ध्वस्त होतात. हा देशाचा इतिहास आहे. गड कोणाचा नसतो, जनतेनं तो बनवलेला असतो, असं म्हणतं बावनकुळे यांनी थेट शरद पवारांना आव्हान देत मिशन बारामतीची घोषणा केली. बावनकुळे बारामती दौऱ्यावरचंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर असून इथं त्यांनी काटेवाडी (बारामती) इथं आज बूथ क्रमांक २१८ समितीचा आढावा घेतला.
या सर्व पार्श्वभूमीवर स्वतःला पक्षात उमेदवारी मिळेना आणि बारामती जिंकणार! असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आरोपाली पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पुणेरी टोला लगावला आहे. पुढे त्यांनी बानवकुळे यांना बाहुला असंही संबोधलं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना शह देण्याची योजना भाजपनं आखली आहे. यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बारामतीच्या दौऱ्यावर होते.



