पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी गणपती आरती करिता दौरा करत नाही. तर 1991 पासून राजकीय कारकीर्द सुरू करताना प्रथम मला या शहरातील नागरिकांनी निवडून दिले. तेव्हापासून आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा या शहरात येतो तेव्हा मला वेगळाच आनंद मिळतो. मागील दोन वर्षात कोविड काळ असल्याने शहरात आरतीसाठी येता आले नाही. मात्र, यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. अशा मंगल प्रसंगी शहरातील विविध मंडळांना भेटी देत आहे, असे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी “महाराष्ट्र माझा” च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
अजितदादा पवार यांच्या हस्ते पिंपळे सौदागर परिसरातील शिवशंभो सेवा मंडळ, क्रांती मित्र मंडळ, क्रांती क्रिडा मंडळ तसेच पिंपरी गावातील तीन मंडळाच्या श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी मंडळांचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अजितदादा यांचे माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितलताई काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी काटे परिवाराच्या वतीने दादाचा सत्कार श्री गणेशाची मुर्ती व शाल, पुष्पगुच्छ देवुन करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलासशेठ लांडे, माजी महपौर संजोग वाघेरे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.





