पुणे : राज्यात सत्ताधारी पक्षातील मुख्यमंत्र्यापासून सर्व मंत्री आमदारांनी गणपती दर्शनासाठी मोठी चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुण्यात अभिनेते नाना पाटेकर यांच्या डोणजे येथील निवासस्थानी आज भेट दिली. गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेत शेतकरी बांधव व सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

काल मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि लालबागचा राजा गणेशोत्सवाला भेट देऊन श्रीगणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध कर, राज्यातील सर्व नागरिकांना सुखी ठेव, महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा धावता ठेव, कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य अशा सर्व क्षेत्रातील देशातील सर्वात प्रगतशील, अव्वल राज्य हा महाराष्ट्राचा लौकिक कायम राहू दे, अशी प्रार्थना श्रीगणपती बाप्पांकडे अजितदादांनी केली.




