चिंचवड : आपल्या लाडक्या गणेशाला निरोप देण्यासाठी शहरातील अनेक नागरिक सहकुटुंब रस्त्यावर उतरले आहे. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… या घोषणांनी चिंचवड गावातील परिसर दुमदुमला होता. पवना नदीत पात्रात पाणी थेट विसर्जनासाठी पालिका प्रशासनाकडून नागरिकांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे नदीपासून काही अंतरावर नागरिकांना आपले गणेश मूर्ती कृत्रिम हौदात विसर्जन करावे लागत आहे. यावेळी गणपती बाप्पाच्या निरोपासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह सपत्नीक उपस्थित राहिले होते.

चिंचवड गावात परिसरातून येणारे अनेक गणेश मंडळांच्या स्वागतासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची सपत्नीक चिंचवडमध्ये हजेरी लावली होती. यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. चापेकर चौकात महापालिका आणि पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले.




