चिंचवड : चिंचवड गाव येथील माणिक कॉलनी तानाजीनगर मधील 18 मीटर डीपी रोडचे काम गेले अनेक दिवस बंद पडले आहे. त्यामुळे तेथे गेले तीन महिने झाले एक ड्रेनेज रस्त्याच्या कामामध्ये ठेकेदाराकडून तुटलेले आहे. त्या ड्रेनेजमधून मैला पाणी नदीमध्ये जाऊन नदीचे प्रदूषण वाढत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरातील कचरा निर्मूलनांबरोबर नद्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. एसटीपी प्लॅन्ट करिता कोट्यावधी रुपये खर्च करून नदी पात्र स्वच्छ करण्यासाठी खर्च केले जातात. मात्र दुसरीकडे ड्रेनेजमधून येणारे सर्व पाणी थेट नदी पात्रात मिसळत असेल तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न का निर्माण होणार नाही. याबाबत भोवतालच्या बिल्डिंग मधील लोकांना त्याचा दुर्गंधीचा वास येत आहे. साथीच्या रोगांना आमंत्रण देत आहे त्यामुळे नागरिक आजारी पडत आहे
यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा दखल घेतली जात नाही. संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे परंतु त्याकडे प्रशासनाकडून सक्षम दुर्लक्ष केले जाते. तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व संबंधित विभागांनी याचे काम त्वरित करून द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर व नागरिकांच्या वतीनेदेखील केली गेली आहे
#स्थापत्यविभाग #आरोग्यविभाग #ड्रेनेजविभाग




