पिंपरी : मागील तीन चार वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. परंतु मागील २ वर्षापासून धरण क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण अधिक झाल्याने तसेच पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. असे असताना दिवसा आड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कामगार महिलांचे अतोनात हाल होतात. त्यांना तारेवरची कसरत करावी लागते कामाच्या वेळा सांभाळून त्यांना पाण्याचे नियोजन करावे लागते. त्यामुळे शहरवासियांना २४/७ जमलेे नाही तरी किमान दररोज ४ ते ५ तास पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी शिवसेना महिला पदाधिकारी यांनी आयुुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
यावेळी सौ सुलभाताई उबाळे (जिल्हासंघटिका), माजी नगरसेविका सौ.मिनल विशाल यादव, सौ वैशाली मराठे (उपजिल्हा संघटिका), सौ वैशाली कुलथे (उपशहरसंघटिका), रजनी वाघ (उपशहरसंघटिका), सौ बेबी सय्यद ( विभागसंघटिका), सौ कोमल जाधव (विभागसंघटिका), सौ शिल्पा अनपन (विभागसंघटिका), सौ अश्विनी खंडेराव (विभागसंघटिका), सौ प्रांजल पाडेकर, सौ स्मिता पाटील, सौ शोभा मोरे (विभाग संघटिका मोहननगर ) आदी महिला कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेच्या कारभारावर प्रशासक नेमल्यामुळे महापौरांची खुर्ची रिकामी आहे व गोरगरिबांना वाटण्यात येणारी वैद्यकीय मदत थांबण्यात आलेला आहे. तरी आपण प्रशासक म्हणून या महापौर निधीचा गोरगरिबांना फायदा व्हावा म्हणून त्याचे वाटप आपल्या वतीने पुन्हा चालू करावा याचे निवेदन देण्यात आले.




