पिंपरी : मावळ तालुक्यातील कोथूर्णे घटनेतील अत्याचारित कै. कू. स्वरांजली चांदेकर चिमुरडीचा आज १८ सप्टेंबर रोजी वाढदिवस.. यानिमीत्ताने तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी तसेच समाजातील विकृत घटकांना वेळीच शिक्षा व्हावी या उद्देशाने पिंपरी गाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा कविता आल्हाट व माजी नगरसेविका उषा वाघेरे यांच्यासह महिलांनी एकत्रित येऊन अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
https://maharashtramaza.online/?p=157692
मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील एका सात वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून अत्याचार करत निर्घृण हत्या प्रकरणातील नराधमाला भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच सदर केस फास्टट्रॅक (जलदगती न्यायालयात) कोर्टात चालवावी व आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी याकरिता राज्य सरकारने तातडीचे प्रयत्न करावेत असे म्हटले आहे.
मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेचे वृत्त वाऱ्याच्या वेगाप्रमाणे संपूर्ण तालुक्यासह राज्यात पसरताच सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रकरणातील नराधम आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी सर्व पक्षीय व नागरिकांच्या वतीने निषेध मोर्चा काढून आंदोलन करण्यात आली. त्याच कू. स्वरांजली चांदेकर चिमुरडीचा आज १८ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. तिला तिच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीत तिच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व कँडेल लावून महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अखेरची श्रद्धांजली अर्पण केली.




