पिंपरी : शिक्षण मंत्र्यांच्या विचाराधीन असलेल्या गृहपाठ बंदच्या निर्णयामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असाच एकंदरीत सूर दिसून येत आहे. मुलांची लेखन-वाचनाची सवय बंद होईल. तसेच, विद्यार्थांच्या आभ्यासावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सद्यस्थितीतील शाळकरी मुलांचे कोरोना महामारीमुळे दोन वर्ष नुकसान झाले आहे. मुलांना मोबाईलची गोडी व मैत्री झाली आहे. त्यातच जर गृहपाठ बंद केला तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होणार आहे. लेखन आणि वाचन या दोन्ही गोष्टीवर गृहपाठ बंदमुळे परिणाम होणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा गृहपाठावर अवलंबून असतो आणि गृहपाठ बंद केला तर घरातील मिळणारा रिकामा वेळ हा वायफट जाईल. त्यामुळे मुलांची अभ्यासाची गोडी कमी होईल.
राज्य सरकारकडून आढावा बैठकीत शाळेच्या अभ लक्ष केंद्रित करण्याकरिता तसेच शालेय मुलांना अतिरिक्त तणावाच बोजा कमी होण्याचा उद्देश गृहपाठ बंद करण्यावर विचार केला ज आहे. यावर पिंपळे गुरव परिसरातील पालक व शिक्षकांनी गृह सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे. तसेच, गृहपाठ बंद के विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचे सांगितले.
शाळेचा गृहपाठ मुलांना असण्याची गरज आहे. आल्यावर समजून मनाने गृहपाठ मुलांनी लिहा रीतीने शाळेने गृहपाठ द्यावा. काहीवेळ विद्यार्थी सुटीनंतर म गृहपाठ नुसता उतरवतात. यातून मुलांना काही उमजत नाही शक्यतो गृहपाठ मोजकाच असावा जेणेकरून मुलांना भविष्य त्याचा उपयोग होईल.
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. लवकरच यावर तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याबाबत उपनगरातील पालक आणि शिक्षक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गृहपाठ बंदमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्यामुळे तो पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.
-कावेरी जगताप,



