पिंपरी : मोशी- जाधववाडी मधील प्रभागात ‘लक्षवेध फाउंडेशन’ च्या मदतीने लम्पी हटवा, पशुधन वाचवा ‘ ही मोहीम प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर अध्यक्षा प्रा.सौ.कविता आल्हाट यांच्या वतीने स्वखर्चाने जनावरांचे लसीकरण करून राबविण्यात येत आहे.
अर्थव्यवस्था कणा असलेला शेतकरी चहूबाजूंनी संकटांनी वेढलेला दिसून येत आहे . सद्य:परिस्थितीत कांद्याचा पडलेला भाव , ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीतील उभ्या पिकांचे नुकसान आणि त्यातच भर म्हणजे बळीराजाचे महत्वाचे साधन असलेला व दुग्ध उत्पादनाचे साधन असलेल्या जनावरांना लम्पी रोगाचा संसर्ग सुरू आहे.
यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण असताना लक्षवेध स्पोर्ट्स फाउंडेशनने लम्पी हटवा, पशुधन वाचवा ही मोहीम सुरू केली आहे.जनावरांना मोफत लसीकरण करून शेतकऱ्यांना दिलासा देत आहे. लक्षवेध स्पोर्ट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रा.कविता आल्हाट, यांनी आपला सामाजिकतेचा वारसा पुन्हा एकदा जपला आहे . मोशीतील सावतामाळी नगर , बोऱ्हाडेवाडी, आणि जाधववाडी येथे घरोघरी जाऊन जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे मोशी भागातील शेतकरी व गोठा मालक यांनी आनंद व्यक्त केला आहे.




