नवी दिल्ली – गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या वकिलाने पंजाब पोलिसांवर खळबळजनक आरोप करत लॉरेन्स बिश्नोईची बनावट चकमक किंवा अन्य कोणतीही अनुचित घटना घडवून आणली जाऊ शकते, असा खळबळजनक आरोप केला आहे. यावेळी बिश्नोईचा पंजाब पोलिसांकडून एनकाऊंटर केला जाईल, अशी भीती बिश्नोईच्या वकिलांनी व्यक्त केली आहे.
वकिलाने दावा केला की,’केंद्रीय एजन्सींनी पंजाब पोलिसांनाही या संदर्भात अलर्ट पाठवला आहे. विशाल चोप्राने पंजाब पोलिसांवर आरोप केला की, ‘कोर्टात हजेरी दरम्यान पंजाब पोलिस बिश्नोईला त्याच्याच साथीदारांच्या मदतीने बनावट एन्काउंटर करू शकतात किंवा प्रतिस्पर्धी टोळीला संधी देऊन त्याला ठार करू शकतात. याशिवाय सुरक्षेत त्रुटी निर्माण करून कोणतीही अनुचित घटना घडू शकते. ते म्हणाले की, बिश्नोई गेल्या अनेक महिन्यांपासून पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे.



