पुणे-मराठी लेखक, संशोधक, संत साहित्याचे आणि लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक, व्याख्याते, प्रवचनकार आणि भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे आज संध्याकाळी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. सायंकाळी घरी पूजा करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
संतसहित्य आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक-लेखक व ‘बहुरूपी भारूड’कार डाॅ. रामचंद्र देखणे (वय ६६ ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या घरामध्ये देखणे यांचा जन्म झाला. बी. एस्सी. आणि एम. ए. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पीएच. डी. संपादन केली. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. ३४ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले. ‘संत विचार प्रबोधिनी‘ ही दिंडी घेऊन देखणे अनेक वर्षे सातत्याने पंढरीची पायी वारी करीत असत.




