पिंपरी (प्रतिनिधी) राज्यातील सत्ता गेली आहे. त्यामुळे आता यांचे काही खरं नाही, असे म्हणून जर नगरसेवक आढावा बैठकीला येत नसतील तर त्यांना सांगतो गेलेली सत्ता कधीही येऊ शकते. प्रत्येकाचा टाइम कधीही बदलू शकतो, असे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गैरहजर नगरसेवकांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच गैरजर नगरसेवकांचा यादी पाठवा, अशी सूचना पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित सभासद नोंदणी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत पाटोल बोलत होते. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, महिलांच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे, शहर महिला अध्यक्षा कविता आल्हाट, माजी महापौर संजोग वाघेरे, प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, फजल शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष श्याम लांडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, शमीम पठाण, युवक अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्ष वर्षा जगताप आदी उपस्थित होते.
राज्यातील सत्ता गेल्यामुळे नगरसेवक बैठकांनाही नसतील तर प्रत्येकाचा टाइम कसा बदलू शकतो. गेलेली सत्ता कधीही येऊ त्यामुळे नगरसेवकाना माझा निरोप पोहचवा त्यांची यादी करून मला पाठवा, अशी सूचना पाटील यांनी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना केली.
पाटील पुढे म्हणाले, पक्षाच्या सर्व सेलच्या पदाधिकान्यांनी सभासद नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थी आघाडीने प्रत्येक महाविद्यालयाच्या बाहेर टेबल टाकून नोंदणी अभियान राबवा. एका देशमुख नावाच्या पदाधिकायाशी संवाद साधताना तुम्ही किती सभासद नोंदणी केली, अशी पाटील यांनी विचारणा केली असता संबंधित पदाधिकाने कमी आकडा सांगितला. त्यावर देशमुख, पाटील, पवार, शिंदे आडनावाच्या पदाधिकाऱ्यांनी कमीत २०० सभासद नोंदणी करावी, अशी टिप्पणी केल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसेच नगरसेवकांकडे अनेक नागरिक येत असतात. त्यांनी किमान २०० क्रियाशील सभासद नोंदणी करावी, असे पाटील म्हणाले.




