“भक्ती -भाव सुमने” मैफिलीने वर्धापन दिन सोहळा सजला
निमित्त होते श्री विठ्ठल रुक्मिणी प्रेरणा मंडळाच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त 21 ते 24 सप्टेंबर मध्ये माऊली उद्यानातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील प्रवचने, कीर्तने व सुमधुर स्वरसंध्येंचे….
डॉ.अनघा राजवाडे, संजय मरळ यांनी सादर केलेल्या भावभक्ती गीतांना विठ्ठल भक्तांनी भरभरून दाद दिली.
अशी चिकमोत्याची माळ, क्षणभर, उघड नयन देवा, नंदकिशोरा चित्त चकोरा, शिर्डीवाले साईबाबा, नेसले ग बाई चंद्रकला ठिपक्यांची, शोधीशी मानवा, निर्गुणाचा संग धरिला, मेरे वतन के लोगो, आज आनंदी आनंद झाला, चांदणं झाली रात, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, त्या सावळ्या तनुचे, मी राधिका या भक्ती गीतांच्या प्रभावी सादरीकरणाने वातावरण भक्तीमय झाले.
माजी नगरसेविका शर्मिला व राजेंद्र बाबर यांनी भक्तीसंध्येचे उत्तम प्रायोजन केले. विजयदत्त निमक, विनोद कदम, सोनगीरे व सौ. कोत्तूर यांनी कलाकारांचे स्वागत केले व उचित सन्मान केला. आमदार अण्णा बनसोडे, सौ. शैलजा मोरे, आर. एस. कुमार व अमित गावडे यांची उपस्थिती लाभली. सौ स्वाती मोडक यांनी सुयोग्य निवेदन केले. बापू चौधरी, शिरीष धर्माधिकारी व विवेक गोडसे उत्तम साथ संगत केली.




