लोणावळा : अडचणीच्या काळात जो शिवसेनेसोबत आहे तोच खरा शिवसैनिक असे कार्यकर्त्यांना सांगताना अंबादास दानवे म्हणाले. आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. पक्ष चिन्ह कोणाला मिळणार या विषयात तुम्ही पडू नका, बाळासाहेबांचे विचार व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. शिवसेना कोणाची आहे हे जगाला माहिती आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. त्यांनी माझ्या उद्धव व आदित्य यांना सांभाळा असे सांगितले आहे. त्यांच्या सोबत काम करा. शिवसेना चाळीस गद्दारांची नाही. कडवट शिवसैनिकांची आहे, भामटे, गद्दार, बंडखोर यांची नाही. कोर्टाचा निकाल येऊ द्या मंग बघू असे काही जण म्हणत आहे. पण काय व्हायचं ते होऊ दे आपण बाळासाहेबांच्या विचारांसोबत रहायचे. आपण होतो कोण मंग आपल्याला आजुन काय व्हायचं आहे. चिन्ह निशाणी या विषयात जाऊ नका. लोकांनी विचारले पाहिजे तुमची निशाणा कोणती आहे असे काम करा असा सल्ला दानवे यांनी दिला.
यावेळी शिवसेना माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, सुरेश गायकवाड, शांताराम भोते, युवासेना जिल्हा अधिकारी अनिकेत घुले, तालुका अधिकारी विजय तिकोणे, शैला खंडागळे, माजी नगरसेविका श्रीमती शादान चौधरी, उपतालुकाप्रमुख आशिष ठोंबरे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेचे काम बुथ स्तरावर जाऊन करा, सरकार जेथे चुकेल तेथे रस्त्यावर उतरा. रस्त्यावर उतरुन संघर्ष करणारी शिवसेना आहे. पुर्वी तलवार घेऊन शिवसैनिक फिरत होते. आता शब्द हीच तलवार आहे. त्यावेळी परिस्थिती तशी होती. तेव्हा दगडांना शिवसेनाप्रमुखांनी घडविले आहे. आता लोकं म्हणात पुर्वीची शिवसेना राहिली नाही, मंग आता काय हातात तलवारी घेऊन ज्यांना घडविले त्यांच्यावर हातोडे घालायचे का ? आता संघर्ष आचार, विचारा ची तलावर घेऊन लढायचे आहे. मनात आत्मविश्वास ठेवा, तुम्ही जिंकू शकता हा संकल्प करा असे आवाहन अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना केले.




