कार्ला – पर्यटन दिनानिमित्त कार्ला येथील महाराष् पर्यटन विकास मंडळाचा पर्यटक निवास केंद्राचे व्यवस्थापक सुहास पारखी यांंच्या मार्गदर्शनाखाली निवास केंद्राच्या वतिने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्रामुख्याने पर्यटन केंद्रात आलेल्या पर्यटकांचे गुलाबपुष्प तसेच जंगल ट्रेल, नेचर ट्रॕक तसेच लोणावळा व्हि पी एस काॕलेज मधील विद्यार्थांंना ‘जबाबदार पर्यटन व पर्यटन क्षेत्रातील रोजगार याबाबत डाॕ विजय कोल्हे यांनी मार्गदर्शन केले तर कार्ला एकविरा विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थांंसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या चित्रकला स्पर्धेत ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर प्रथम रंजना बर्मा, द्वितीय प्रणाली नरवडे, तृतीय वर्षा सरोज, उत्तेजनार्थ अनिशा गायकवाड या विद्यार्थांंनींचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रके व देऊन गुणगौरव करण्यात आला.
यावेळी कार्ला निवास केंद्राचे व्यवस्थापक सुहास पारखी, संदेश जुंदरे, सिध्देश ढोले, कार्ला ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे, सागर हुलावळे, निलम प्रसाद, कार्ला विद्यालय मुख्याध्यापक कैलास पारधी, प्राचार्य रामदास दरेकर, संतोष हुलावळे, उमेश इंगुळकर, रंजना नवाळे, शितल शेटे, संदिप शिर्के, बंटी हुलावळे, अमर गुरव, मच्छिंद्र वायकर यांंच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थीत होते.




