चिंचवड: महासाधू श्री मोरया गोसावींच्या पदस्पर्शाने पावन आणि क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या शौर्याने पुनीत झालेल्या चिंचवडनगरीमध्ये चिंचवड नवरात्र महोत्सवात आज आदिशक्तीची – साडेतीन शक्तीपीठांची प्रतिष्ठापना करण्यात आली.
संपूर्ण सजावट पाहण्यासाठी येथे क्लिक करा…..👇
https://fb.watch/fOUYTTOHpb/
चिंचवड नवरात्र महोत्सवामध्ये गजमहल प्रतिकृती उभारली आहे. यामध्ये ५० x २१ आकार व ३५ फुट उंच अशा भव्य आकराचे सुवर्ण गजमहल प्रतिकृती व साडेतीन शक्तीपीठ दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गजानन चिंचवडे यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाची सुरुवात केली होती. आज सलग १० वर्षापासून ही महोत्सव परंपरा सुरू आहे. सायंकाळी ५ वाजता देवीची स्थापना करण्यात आली. आरती मा. श्री शंकरशेठ जगताप-चिंचवड विधानसभा भाजपा निवडणुक प्रचार प्रमुख व मा. श्री व सौ मंदार देव महाराज – विश्वस्त, चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्या हस्ते झाली. त्यानंतर स्वानंद धुपारती मंडळाची धुपारती झाली.
चिंचवडमधील माजी नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे जनसंपर्क कार्यालयासमोर श्री मोरया गोसावी समाधी मंदिररोड येथे नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती चिंचवड नवरात्र महोत्सव संयोजिका माजी नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे यांनी दिली.




