भोसरी : स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल येथील स्वामी विवेकानंद काव्यमंच अंतर्गत ‘कविता कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कवीवर्य मा. प्रा. राजेंद्र सोनवणे लाभले.
यावेळी काव्यमंचातील सभासद सदस्यांनी आपल्या कवितांचे वाचन केले. मा. प्रा. राजेंद्र सोनवणे यांचे ‘कविता कशी सुचते व कशी तयार करावी’ या विषयावरील अनमोल मार्गदर्शन कवी सदस्यांना लाभले.
यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष विनायक भोंगाळे, सचिव संजय भोंगाळे, व्यवस्थापकीय संचालक कविता भोंगाळे पाटील, विश्वस्त सरिता विखे पाटील आदी उपस्थित होते. या कार्यशाळेचे नियोजन श्रद्धा गुरव व भारती पाटील यांनी केले. स्वाती निकम पाटील यांनी सूत्रसंचालन केले व अशोक बुरडे यांनी आभार मानले.




