पिंपरी : गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर नवरात्र महोत्सवाला यावर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात दांडीया, गरबा खेळला जातो. मागील दोन वर्षे कोरोनाच्या साथीमुळे राज्यात दांडीया आणि गरब्याला बंदी होती. पण यावर्षी मोठ्या उत्साहाने नवरात्र साजरी केली जात आहे त्याचबरोबर विशेषता महिला वर्गातून नऊ रंगाच्या साड्या घालून हा उत्सव साजरा केला जातो.

नवरात्रोत्सवात नऊ दिवसाला नव – नवीन साड्या घातल्या जातात. ऑफिस, काम, स्कूल, कॉलेजमध्ये जाणाऱ्या महिला, मुली हे नवरात्रीचे नऊ रंग अगदी आर्वजून पाळतात. निळा रगं हा उर्जेचे प्रतीक मानला जातो. विश्वासाचं, श्रद्धेचं, सुस्वभावाचं, आत्मीयतेचं प्रतिक म्हणजे निळा रंग. असाच निळ्या रंगाच्या साड्या नेसलेला पेहराव जागर आदिशक्तीचा शिव अपार्टमेंट महिला मंडळ काळेवाडी पिंपरी पुणे येथील महिलानी केलेला दिसून आला.
निळ्या रंगाचे महत्त्व….
भारताच्या राष्ट्रीय ध्वजात मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे म्हणजेच २४ तास प्रगतीकडे वाटचाल करणारा निळा रंग. शांततेचा प्रतीक, शीतलता आणि स्निग्धता हि या रंगाची खास वैशिष्टे. मेंदूवर निळ्या रंगाचा चांगला प्रभाव पडत असतो. वाईट स्वप्न आणि विचार यांना निळा रंग काढून टाकत असतो. निळा रंग हा बौद्धिक क्षमता वाढवण्याचे काम करत असतो. समुद्र आणि आकाश यामध्ये निळ्या रंगाची अनुभूती मिळते. वातविकारांच्या लोकांसाठी निळा रंग लाभदायक ठरतो. स्वयंपाक घरात हा रंग वापरणे टाळावे. देवी नारायणीशी संबंधित असा सुस्वभावी निळा रंग आहे.




