रहाटणी : नवरात्र महोत्सव यावर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात दांडीया, गरबा खेळला जातो. मागील दोन वर्षे कोरोनाच्या साथीमुळे राज्यात दांडीया आणि गरब्याला बंदी होती. पण यावर्षी मोठ्या उत्साहाने नवरात्र साजरी केली जात आहे.

रहाटणी येथील नवरात्र महोत्सवामध्ये २३ फूट उचीची श्री महालक्ष्मी कोल्हापूर देवीची प्रतिकृती उभारली आहे. यामध्ये देवीची भव्य आकाराचे प्रतिकृती दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते व युवानेते शुभम नखाते यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाची सुरुवात केली होती.

याचबरोबर रहाटणी परिसरातील सर्व नागरिकांसाठी गरबा दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. गेले दोन वर्षे कोरोनामुळे नवरात्रोत्सवावर शासकीय निर्बंध होते. मात्र यावर्षी निर्बंधच रद्द करण्यात आल्याने नवरात्रोत्सवात विशेषता तरुणाईमध्ये दांडिया खेळायला मोठी गर्दी होताना दिसत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने नखाते यांनी श्री महालक्ष्मी देवीचे भव्य प्रतिकृतीसह दिव्यांच्या रोषणाईने आणि दांडिया खेळायला मिळत असल्याने परिसरातील नागरिक भारावून गेले आहे.




