पिंपरी (प्रतिनिधी) मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी किवळे येथे गेलेल्या महिलेला दोघांनी जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच तिचा विनयभंग केला.
याप्रकरणी पीडित ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार ईश्वर दरेकर (वय ३४, रा. पुरंदर) आणि एक महिला (वय ५२) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला त्यांच्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी किवळे येथे आल्या होत्या. फिर्यादी त्यांचे कुटुंबीय आणि मैत्रिणीचे कुटुंबीय थांबले असताना आरोपींनी फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले. व्यवसाय बंद करण्याची, बदनामी करून लग्न न होऊ देण्याची धमकी दिली. अश्लील हातवारे करून त्यांचा विनयभंग केला.




