पिंपरी (प्रतिनिधी) चालू आर्थिक वर्षाच्या प्रथम सहा महिन्यांतील शेवटच्या दिवशी कर संकलन विभागाला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभरात एकूण १२०० मिळकतधारकांनी तब्बल २ कोटी ४८ लाख ७३ हजार १८५ एवढा करभरणा केला. गेल्या सहा महिन्यांत महापालिकेच्या कर संकलन विभागाकडे एकूण ३५९ कोटी ८१ लाख ३८ हजार ८७३ रुपये कर जमा झाला आहे.
शहरातील मिळकतधारकांना कर भरण्यासाठी चालू आर्थिक वर्षांच्या प्रथम सहा महिन्यातील तसेच सवलतीचा शेवटचा दिवस होता. दिवसभरात मिळकतधारकांचा करभरणा करण्यास चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभरात तब्बल १२०० मिळकतधारकांनी आपला जमा झाला. मिळकतकर भरणा केला. यासह चालू आर्थिक वर्षातील चालू सहा महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एकूण ३५९ कोटी ८१ लाख ३८ हजार ८७३ एवढा मिळकत कर जमा झाला आहे. सर्वाधिक मिळकतधारकांनी ऑनलाईन करभरणा करण्यास पसंती दिली.
ऑनलाईनद्वारे एकूण १ लाख ६० हजार १६२ मिळकतधारकांनी एकूण २०७ कोटी ८७ लाख ९९ हजार ५८ एवढा कर जमा केला. तर, समायोजन माध्यमातील २२ हजार १८५ मिळकतींचा १६ कोटी ५० लाख ९९ हजार ४९९ एवढा कर मिळकतधारकांनी मूळ मिळकत कर भरण्यावर भर दिला. ४८ हजार २०६ मिळकतधारकांनी ३८ कोटी ६२ लाख ३३ हजार ५४१ एवढा रोख स्वरुपात करभरणा केला. २५१ जणांनी डीडी, ६८२ जणांनी ईडीसी, २३८ जणांनी एनईएफटी, १५९ जणांनी आरटीजीएसद्वारे कर भरणा केला. करभरणा करण्याचा आज शेवटचा दिवस होता.




