तळेगांव स्टेशन (संदीप गाडेकर) पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघाच्या वतीने भोर येथील भोरेश्वर लॉन्स मंगल कार्यालय येथे रविवार, दि. 02 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
श्री पद्मावती विद्यामंदिर व ज्यूनि. कॉलेज, उर्से. ता. मावळ येथील इंग्रजी विषयाचे सहशिक्षक श्री अशोक श्रीराम काळे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेली 20 वर्ष इंग्रजी विषयाचे अध्यापन कार्य करत आहेत.
सदर पुरस्कार संग्राम दादा थोपटे आमदार भोर वेल्हा मुळशी, टीडीएफचे राज्य कार्याध्यक्ष जी के थोरात, महाराष्ट्र राज्य विश्वस्त के एस ढोमसे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री वसंतराव ताकवले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.




