पिंपरी ( प्रतिनिधी) – प्रथम शैक्षणिक सत्र संपत आल्यावर महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपास करण्यास सुरुवात झाली आहे. आजअखेर ४५ शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, स्वेटर आणि पीटी गणवेश वाटप करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १०५ प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात एकूण ४२ हजार विद्यार्थी शिकत आहेत. त्यांना दरवर्षी शालेय साहित्य वाटप करण्यात येते. त्यामध्ये गणवेश, स्वेटर, पीटी गणवेश, रेन कोट करण्यात येते. मात्र, यावर्षी पावसाळा संपल्यामुळे रेनकोट वगळून गणवेश, स्वेटर आणि पीटी गणवेश वाटपाचा निर्णय घेतला. हे साहित्य शाळा सुरू झाल्यानंतर
पहिल्या महिन्यात पुरवठा करणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना वेळेत साहित्य मिळाले नाही. शेवटी साहित्य खरेदीचे आदेश संबंधित पुरवठादाराला दिल्यानंतर साहित्य खरेदी करण्यात आले. खरेदी करुनही हे साहित्य बरेच दिवस पडून होते. शेवटी प्रशासनावर दबाव वाढल्यानंतर पुरवठादाराला साहित्य वाटपाचा आदेश देण्यात आला.
आजअखेर ४५ शाळांमध्ये साहित्य वाटप पूर्ण झाले आहे. विद्यार्थ्यांना गणवेश, स्वेटर आणि पीटी गणवेश वाटप करण्यात येत आहे. उर्वरीत ६० शाळेंमध्ये गुरुवार (दि. १३) पर्यंत वाटप पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितली.



