पिंपरी (प्रतिनिधी) दारू पिऊन पोलिसाला शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही घटना भोसरी पोलीस ठाणे बुधवारी रात्री घडली.
विकास दारू ससाणे (वय ३३, रा. गांधीनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रशांत पासलकर यांनी बुधवारी (दि. ५) याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आरोपी दारू पिऊन भोसरी पोलीस ठाण्यात आला. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्या दमदाटी करीत शिवीगाळ केली. तसेच सरकारी कामात अडथळा आणला.




