पिंपरी (प्रतिनिधी) सहा महिन्यात दाम दुप्पट करून देतो असे सांगून एकाची २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना प्राधिकरण निगडी येथे घडली.
रामदास सुदाम भालेराव (वय ५४, रा. नंदनगिरी हाउसिंग सोसायटी, रावेत) यांनी मंगळवारी (दि. ४) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनोज नारायण पुंडे (वय ५५, रा. शिवाजी पार्क, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २०१२ ते ४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये फिर्यादीच्या राहत्या घरी व प्राधिकरण निगडी येथे घडली. सहा महिन्यांत रक्कम दुप्पट करुन देतो, असे सांगून आरोपी पुंडे याने फिर्यादी भालेराव यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले, सहा महिन्यानंतर फिर्यादी यांची मूळ रक्कम सुद्धा परत दिली नाही.




