वाकड, ७ ऑक्टोबर : विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत असे समजून विद्यार्थ्यांना शालेय वयातच पर्यावरणाचे महत्व समजावे यासाठी प्लास्टिक वापराऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा हि शिकवण देण्यासाठी वाकड येथील रणजीत आबा कलाटे फाउंडेशनच्या वतीने कापडी पिशवी वाटप करण्यात आली. या केवळ पिशव्या नाहीत तर प्लास्टिक पर्यावरणाला किती घातक परिणाम करते याचे मार्गदर्शन भविष्यात मुलांना उपयोगी याचा संदेश मिळेल असे कलाटे यांनी सांगितले.
यावेळी मुलांना पेन्शील, पैड आणि कापडी पिशवी वाटप करण्यात आले. मुलांना शालेय साहित्याचे वाटप कुलकर्णी मडम, बेलापूरकर मडम, रणजीत आबा कलाटे व अभ्यासाची आवड निर्माण व्हावी यासाठी करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यायी कापडी पिशव्यांचे वाटप देण्यात आले.
यावेळी दर्शना कलाटे, श्रुती देवरे, विशाका भागवत, श्रद्धा कलाटे, अक्षदा शेडगे, पूजा बुचडे अडी मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका वसुंधरा कुलकर्णी, शबाना शेख यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले. अनिल सुकाळे यांनी सूत्रसंचालन केले. भांगे सरांनी आभार मानले. तर कुलकर्णी मडम, बेलापूरकर मडम, सुकाळे सर यांचा फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. लता सुपे व विनोद साळुंखे उपस्थित होते.




