वाकड : महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी रणजीत आबा कलाटे फाउंडेशनच्या वतीने गौरी गणपतीनिमित्त सजावट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ हॉटेल बर्ड व्हॅली वाकड येथे शुक्रवार दि.०७ ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.
रणजीत आबा कलाटे फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.स्नेहा रणजीत कलाटे व रणजीत कलाटे यांच्या सौजन्याने वाकड, कस्पटेवस्ती, विशालनगर, पिंपळेनिलख परिसरामध्ये गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२२ आयोजित केली होती. संबंधित परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतला.
या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना सौ.अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, सौ.ऐश्वर्याताई जगताप-रेणुसे, मा.महापौर सौ.माई ढोरे, मा.स्थायी समिती अध्यक्षा सौ.ममताताई गायकवाड, सौ.रतनताई कलाटे, सौ.नंदाताई कलाटे, सौ.विजयाताई कस्पटे यांच्या शुभ हस्ते प्रथम ५ क्रमांकाच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस ठेवलेल्या २५ मिक्सरचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ५ सोन्याच्या नथींचे लकी ड्रॉद्वारे कुपन काढून त्यांचे वाटप झाले. त्याप्रसंगी संबंधित परिसरातील महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




