पिंपरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली. राज्य सरकार सद्यस्थितीत महापालिकांच्या निवडणुका घेण्याच्या मूडमध्ये नाही. त्यांना कोणत्याही परिस्थितीत निवडणुका लांबवायच्या आहेत. अनेक महापालिकांची आणि प्रशासकांची मुदत संपली आहे. मुदत संपल्यानंतर त्याठिकाणी किती दिवस प्रशासन ठेवायचे यालाही मर्यादा असतात. एकीकडे विधानसभेची पोटनिवडणूक लागते मात्र महापालिकेची निवडणूक लागत नाही याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणुक लावली आहे. कोविडचे संकट दूर झाले आहे त्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली तर महापालिका निवडणुका का घेत नाही, यावरून सर्व प्रकार लक्षात येतो. सद्यस्थितीत इच्छुकांचाही खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यांनी आता खर्चाला थोडा आवर घालावा असा मोलाचा सल्ला अजित पवारांनी महापालिकेतील इच्छुक भावी नगरसेवकांना दिला आहे.




