भोसरी : भाजपचे शहराध्यक्ष आणि भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै.सौ.हिराबाई किसनराव लांडगे यांचे नुकतेच निधन झाले. लांडगे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लांडगे यांच्या भोसरी येथील निवासस्थानी भेट दिली.
यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार, खासदार यांनी लांडगे परिवाराच्या भेटी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत व्यस्त वेळापत्रक असतानाही लांडगे कुटुंबियांची आपुलकीने विचारपूस केली.
यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, चिंचवड विधानसभा भाजपा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, यांच्यासह भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते.




