मुंबई : शिवसेनेचे ऐरोलीतील माजी नगरसेवक मनोहर कृष्णा मढवी (एम. के.) यांना अखेर नवी मुंबई पोलिसांनी ठाणे व मुंबई उपनगरे या जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. शुक्रवारीच या हद्दपारीची अंमलबजावणी करण्यात आली, अशी माहिती परिमंडळ-१चे पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
‘पानसरे यांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी दबाव आणला. तसे न केल्यास नवी मुंबईतून तडीपार करू, एन्काऊंटर करू, अशा धमक्या दिल्या. माझ्याकडे १० लाखांची मागणीही केली.’ असे आरोप मढवी यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत केले होते. तर ‘निव्वळ तडीपारीची कारवाई होऊ नये, म्हणून मढवी यांनी खोटे आरोप केल्याचे पानसरे यांनी सांगितले.



