तळवडे: आज दुपारनंतर तळवडे आयटी पार्क देहुगाव तळेगाव चाकण रोडवरील परिसरात पावसाने प्रचंड थैमान घातलं होते. विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यामुळे सुरु झालेल्या पावसाने देहूकरांची धडकी भरवली होती. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. संध्याकाळी पडलेला पाऊस हा अतिशय खतरनाक होता, अशी प्रतिक्रिया काही देहू व तळवडे मधील नागरिकांनी दिल्या आहेत.
परतीच्या पावसामुळे या भागात जोरदार पाऊस पडला. यावेळी रस्त्याच्या दोन्हीही बाजूंना पाणी पाणी झाले होते. तळवडे आयटी पार्क चौक ते तळवडे गावठाण दरम्यान रस्त्याच्या दुतर्फ पाण्याचा लोट वाढल्याने अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. पावसात जर इतका भयानक होता की एक तासभर जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. तळवडे व चाकण एमआयडीसी मधील येणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.




