मुंबई : शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या दृष्टीने निवडणूक आयोगाकडून एक मोठा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलं आहे. याशिवाय ठाकरे गटासाठी ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा मशाल हातात घेतलेला फोटो शिवसेनेकडून व्हायरल करण्यात आला आहे.
हाती घेऊ "मशाल" रे!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
निशाणी : मशाल pic.twitter.com/ryPOTMikxX— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 10, 2022
तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटाची तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगानं अमान्य केली असून पुन्हा नव्याने उद्यापर्यंत तीन चिन्हे सूचवा, असा आदेश निवडणूक आयोगानं दिला आहे.
आयोगाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेतचा फोटो आणि “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार….” असं लिहित भावना व्यक्त केली आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय.
आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…. #बाळासाहेबांची_शिवसेना pic.twitter.com/8UwEMxP3VC— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 10, 2022



