पिंपळे सौदागर : रक्षक चौक ते जगताप डेअरी येथील बीआरटीएस रस्त्याचे वर्षात तीन वेळा खोदकाम केले आहे. एक काम पूर्ण झाले की दुसरे काम करण्यासाठी पुन्हा त्याच ठिकाणी रस्ता खोदला जात आहे. त्यामुळे येथून ये-जा करणारे नागरिक व वाहनचालक महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे त्रस्त आहेत.
सांगवी फाटा ते काळेवाडी फाटा दरम्यान मुख्य बीआरटीएस स्त्यावर असलेल्या दोन्ही बाजूला असलेल्या पदाचे काम सुरू आहे. मागील वर्षात या सत्यालगत पदमार करण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत काम हाती घेण्यात आले होते मात्र स्मार्ट सिटी अंतर्गत दिलेले काम संबंधित ठेकेदाराने पूर्ण केले नाही. त्यामुळे नव्याने वर्क ऑर्डर काढून काम पाहत होते. आता नव्याने वर्क ऑर्डर दुसऱ्या ठेकेदाराला काम देण्यात आले. ऑर्डर देऊन ठेकेदार नियुक्त केला. त्यामुळे कामात दिरंगाई होत आहे.



