पिंपरी (प्रतिनिधी) – आर्थिक अडचणीत असलेल्या पिंपरीतील दि सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ( आरबीआयने) परवाना रद्द केल्याने बँकेचे कामकाज बंद करण्यात आले आहे. यामुळे बँकेच्या सुमारे ३०० कर्मचाऱ्यांचे पिंपरी : पिंपरी कॅम्पातील दि सेवा विकास बँकेच्या मुख्य शाखेसमोर भवितव्य अंधारात आले आहे. या आंदोलन करताना कर्मचारी. सर्व कर्मचाऱ्यांनी बुधवार (दि. १२) रोजी बँकेच्या पिंपरी कॅम्पातील मुख्य शाखेसमोर आंदोलन केले.
पिंपरी बाजारपेठेचे अर्थकारण अवलंबून असणाऱ्या सेवा विकास सहकारी बँकेचा ( आरबीआयने) सोमवारी परवाना रद्द केला. सिंधी समाजातील लोकांनी एकत्र येवून १९७१ च्या सुमारास सेवा विकास बँकेची स्थापना केली होती. कागदपत्रांची पूर्तता होत नसतानाही कोट्यवधींची कर्जे मंजूर करण्यात आली.
या गैरकारभाची तक्रार करण्यात आली. याप्रकरणी गुन्हेही दाखल झाले. बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या शक्यता नाही. आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केला. त्यामुळे सुमारे ३०० कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात आले आहे. या कर्मचाऱ्यांनी बँकेच्या मुख्य शाखेसमोर आंदोलन केले.




