पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांच्या वतीने व्हॉटसअॅप आणि वेब चाटबोर्ड प्रणालीचा वापर करून नागरिकांच्या विविध सेवासंबंधीच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार असून चाटबोर्ड सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे, चाटबोर्ड सुविधा नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका वर्धापनदिनानिमित्त आयोजित मोरे प्रेक्षागृह येथे नागरी सुविधांसाठी वॉट्सअॅप चाटबोर्ड आणि वेब सेवेचा शुभारंभ आयुक्त सिंह यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. महापालिका आणि स्मार्ट सिटी लि. च्या वतीने इंटीग्रेटेड जीआयएस एबल्ड ईआरपी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सचस्थितीत मोबाईल व टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या मुख्य प्रणालीमध्ये करण्यात आलेला आहे.
सद्यस्थितीत मिळकतकर पाणी पुरवठा, बांधकाम परवानगी, नागरवस्ती विकास योजना, नगररचना इत्यादी विभागांसह विविध २३ विभागांचा समावेश चैटबॉट नागरी सुविधांसाठी वॉट्सअॅप चाटबोर्ड आणि वेब सेवेचा यामध्ये समावेश आहे.




