देहूगाव (वार्ताहर) केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणातील ओडिफ प्लस मानांकन नगरपंचायतीला पहिल्याच प्रयत्न प्राप्त झाल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी दिली आहे.
केंद्र शासनाच्या समिती मार्फत मार्च महिन्यामध्ये गोपनीय तपासणी करण्यात आली होती.नगरपंचायत स्थापनेनंतर ही तपासणी प्रथमच करण्यात आली होती .या तपासणीमध्ये देहू नगरपंचायतीला ओडीएफ (हगणदारी मुक्त ) प्लस मानांकन प्राप्त झाले आहे.ओडिएफ प्लस मानांकन प्राप्त झाल्याने पुढील उपक्रमातील गुणाानुक्रमांक उंचावण्याचा मार्ग सुकर झाल्याचा विश्वास नगराध्यक्षा स्मिता चव्हाण,उपनगराध्यक्षा तथा आरोग्य समिती सभापती रसिका काळोखे यांनी व्यक्त केला आहे.
या अभियाना करिता सर्व सभापती, नगरसेवक,नगरसेविका तसेच सामाजिक संस्था,नागरीक नगरपंचायत अधिकारी,सफाई कर्मचारी यांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.जाधव यांनी दिली आहे.




