पिंपरी (प्रतिनिधी) – शटरचे कुलूप तोडून चोरट्याने ६७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ७ ऑक्टोबर २०२२ रोजी दिघी येथे उघडकीस आली.
राहुल नारायण कांबळे (वय ३६, रा. ताजणे मळा, च-होली यांनी बुधवारी (दि. १२) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कांबळे यांचे न्यू नरसिंह मोटर ड्राइविंग स्कूल नावाचे दिघी येथे कार्यालय आहे. ६ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ ते ७ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान चोरट्याने शटरचे कुलूप तोडून कार्यालयातून ६७ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, टॅब व हार्डडिक्स चोरून नेली.




