पिंपरी (प्रतिनिधी) जमिनीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास तिप्पट रक्कम मिळवून देतो, असे आमिष दाखवून पाच कोटी ८४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
सुशील झांबरे, चंद्रशेखर अरुण चौधरी, पंकज प्रल्हाद चौधरी, किरण गिरीधर चौधरी, मुकेश अशोक कोल्हे आणि एक महिला आरोपी, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच कुंदन दत्तात्रय ढाके यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद मधुकर चौधरी (वय ५१, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी बुधवारी (दि. १२) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १६ ऑक्टोबर २०१७ ते १२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत आकुर्डी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी मिलिंद चौधरी यांना आरोपींच्या सिद्धिविनायक ग्रुप कंपनीमधील रिअल इस्टेटच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितले. फिर्यादी यांना तिप्पट नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना अनसिक्युअर लोन काढायला लावले. २६ ऑक्टोबर २०१७ ते १३ डिसेंबर २०१८ या कालावधीमध्ये आठ टप्प्यांमध्ये सिद्धिविनायक ग्रुप कंपनीच्या विविध बँक खात्यांवर सहा लाख ३४ हजार रुपये घेतले. फिर्यादी यांना घेतलेल्या कर्जाचे व्याजही भरायला लावले. आरोपींनी १० फेब्रुवारी २०२१ रोजी फिर्यादी यांना ५० हजार रुपये परत केले. मात्र फिर्यादींची मुद्दलसह पाच कोटी ८४ लाख रुपये व्याजासह इतकी होती. आरोपींनी देता सदरची रक्कम परत न फसवणूक केली.



