मुंबई : जो काँग्रेस पक्ष गेल्या अनेक महिन्यांपासून अध्यक्षाच्या शोधात होता, त्या पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी अखेर मल्लिकार्जून खरगे यांच्या रुपात नवीन अध्यक्ष मिळाले आहेत. काँग्रेसला गेल्या दोन दशकांत पहिल्यांदाच बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळाले आहेत. देशभरातल्या काँग्रेस कार्यालयासमोर खरगे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला.
दुसरीकडे भारत जोडो यात्रा मोहिमेवर असलेल्या ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनीही खरगेंच्या नव्या इनिंगला शुभेच्छा दिल्या आहेत. तर पक्षातील स्थानावर बोलताना नवे अध्यक्ष खरगेजी माझा पक्षातील रोल ठरवतील, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वातली काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ आंध्रप्रदेशात पोहचली आहे. त्यावेळी ते बोलत होते. आज काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे विजयी झाल्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाच्या भविष्यातील राजकारणावर, खरगे यांच्या अध्यक्षपदावर आणि पक्षातील स्वत:च्या स्थानावर भाष्य केलं.




