पुणे : फोर्ब्सनं श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली असून अपेक्षेप्रमाणं गौतम अदानी यांनी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवलाय. त्यांनी मुकेश अंबानींना मागं टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शेअर बाजारात कंपनीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळं Nykaa च्या प्रमुख फाल्गुनी नायर यांनी प्रथमच या यादीत स्थान मिळवलंय. तर, दुसरीकडं स्टॉक क्रॅशमुळं पेटीएमचे विजय शेखर शर्मा हे भारतातील टॉप 100 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत.




