पुणे : पुण्यात शुक्रवारी (ता. २१) “इन्व्हेस्ट एमपी” या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील आणि एकंदरीतच महाराष्ट्रातील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान पुण्यात येणार आहेत. मध्यप्रदेशचे उद्योगमंत्री, आयएएस अधिकारी आणि मुख्यमंत्री असे सर्वजण या परिषदेला उपस्थित असणार आहेत. त्यामुळे गुजरात प्रमाणे आता पुन्हा महाराष्ट्रातील उद्योग, गुंतवणुकीला मध्यप्रदेशची दिशा मिळणार का? अशी शंका निर्माण झाली आहे.
दरम्यान, मध्यप्रदेशमधील गुंतवणूक वाढावी यासाठी मध्यप्रदेश सरकारकडून दरवर्षी या परिषदेचं मध्यप्रदेशमध्ये आयोजन केलं जातं. पण यावर्षी हे आयोजन पुण्यात करण्यात आल्यामुळे अनेकांच्या नजरा विस्फारल्या आहेत. तर ही परिषद झाल्यानंतर शिवराजसिंह चौहान महाराष्ट्रातील उद्योगपतींशी वैयक्तिकरित्या चर्चाही करणार आहेत. त्यामध्ये संजय किर्लोसकर, बाबा कल्याणी, आश्विनी मलहोत्रा यांच्यासोबतच इतर उद्योजकांचे नावं आहेत.
ही परिषद पुण्यातंच का होतेय?
पुणे हे औद्योगिकदृष्ट्या विकसनशील शहर आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर औद्योगिक विकासाला गती मिळाली. तर पुण्यात किर्लोस्कर, फोक्सवॅगन, टाटा, महिंद्रा, बजाज या ऑटो उद्योगांबरोबरच आयटी क्षेत्रातलेसुद्धा नावाजलेले उद्योग आहेत. आयटीमधील इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा यांसारख्या नावाजलेल्या विविध कंपन्या पुण्यात आहेत. त्याचबरोबर पुण्यात शिक्षण संस्था, पाणी, वीज, रस्ते आणि सुशिक्षित कर्मचाऱ्यांची उपलब्धता असल्यामुळे पुणे शहर नेहमीच इतर उद्योजकांना गुंतवणुकीसाठी खुणावत असते. त्याच दृष्टीकोनातून पुण्यातील उद्योजकांना मध्यप्रदेशकडे आकर्षित करण्यासाठी ही परिषद आयोजित केली असल्याचा अंदाज आहे.वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातलाकाही दिवसांपुर्वीच वेदांता फोक्सकॉन पुणे जिल्ह्यातून प्रकल्प गुजरातला गेला.
फोक्सकॉन पुणे जिल्ह्यातून प्रकल्प दीड लाख कोटी गुंतवणूक आणि जवळपास एक लाख रोजगारनिर्मिती होणार असलेला हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं होतं. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीमुळे भाजपचा हा डाव असल्याचा आरोप अनेकांनी केलाय. तर राज्यातील सध्याच्या भाजप सरकारने महाविकास आघाडी सरकारवर ठपका ठेवला आहे. मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प गुजरातला गेल्याचं सध्याच्या राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे.



