पिंपरी, दि. 30 – इंन्स्टाग्रामवर महिलेचा फोटो वापरुन बदनामी करण्यात आली. हा प्रकार 4 ते 29 ऑक्टोबर दरम्यान घडला. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल नंबर 8369687022 आणि इन्स्टाग्राम अकाउंट satti7shiv यावरील व्यक्तीने त्याच्या अकाउंटवर फिर्यादी यांचा फोटो वापरून तसेच अश्लील शब्दाचा वापर करून पोस्ट केली. ती पोस्ट फियार्दी यांच्या नातेवाईंनी पाहिली त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना माहिती दिली. फिर्यादी यांनी याप्रकरणी आळंदी पोलिसात तक्रार दाखल केली असून सदर अकाउंट चालवणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर विनयभंग आणि सायबर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




