पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील चौका चौकात अनेक भिक्षुक आणि दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या विक्रीचे मोठी गर्दी असते. शहरातील प्रत्येक सिग्नल वरती वाहनांची मोठी वर्दळ असते. यांचा फायदा घेत लहान मुलांच्या वापरण्यासारख्या वस्तूची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. यापैकीच एक निर्माण पाण्यापासून हवेत बलून उडवणाऱ्या मशीनची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. या मशीनच्या डेमो देणारे मशीनपासून तयार होणारे बलून चौकात चौकातील नागरिकांच्या डोळ्यावरती येत असल्यामुळे त्यांना डोळ्याचा त्रास उद्भवू शकतो याचा विसर मात्र विक्रेत्यांना पडला आहे.
उद्योग नगरीत लाखो नागरिक दैनंदिन कामासाठी व कंपनीत नोकरी धंद्यासाठी प्रवास करत असतात. शहरात चार चाकी पेक्षाही दुचाकी स्वरांचे प्रमाण अधिक आहे. शहरातील ठिकठिकाणी सिग्नलवरती अनेक दैनंदिन वापराच्या वस्तूंची विक्री करणारे विक्रेते दिसून येतात. यामध्ये पेन, छत्री, लहान मुलांची खेळणी, डसबिन बॅग, लहान मुलांसाठी बलून बनवणारे मशीन अशा अनेक वस्तूंची खुलेआम सर्रास विक्री केली जाते.
यामध्ये निर्मितीच्या पाण्यापासून बलून तयार करणारे मशीनचे विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे या बलन्स मध्ये निर्णयाचा अंश असल्यामुळे दुचाकी सरांच्या डोळ्यांमध्ये हवेमुळे हे बलून फुटले जातात. याने नागरिकांना डोळ्याचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे पोलीस वाहतूक प्रशासनाने यावरती ताबडतोब लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.




