साहेब दिवाळी बोनस नाही किमान नगरपंचायतीमध्ये समावेशन तरी
रामकुमार आगरवाल .
देहूगाव : देहू नगरपंचायतीच्या कायम व हंगामी कर्मचाऱ्यांना यंदाही दिवाळी बोनस मिळाला नसल्याने नाराजीचा सूर आहे त्यामुळे साहेब दिवाळी बोनस नाही तर किमान नगरपंचायतीमध्ये समावेशन करून घ्यावी अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
देहू ग्रामपंचायतीचे सुमारे दोन वर्षांपूर्वी ( ८ डिसेंबंर २०२० ) नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. कोरोना काळात पोलीस प्रशासन, डॉक्टर,आरोग्य सेवक यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे ग्रामपंचायतीतील सुमारे २४ कायम तर सुमारे ३० हून अधिक कंत्राटी कर्मचारी अद्याप ही कार्यरत आहे. मात्र ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांचे अद्याप समावेशन झालेले नाही.
त्यामुळे मिळणारे ग्रामपंचायतीचे वेतन वगळता तर ठेकेदाराकडून शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवली आहे. त्याचप्रमाणे अनियमित देणाऱ्या तुटपूजां वेतनाचे कंत्राटी कर्मचाऱ्यांना ही गत दोन वर्षांपासून दिवाळी बोनस ( सानुग्रह अनुदान ) मिळाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. त्यामुळे साहेब दिवाळी बोनस नाही तर किमान नगरपंचायतीमध्ये समावेशन करून घ्या अशी म्हणण्याची वेळ आली आहे.




