पिंपरी (प्रतिनिधी) – सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सारथी हेल्पलाइनला आलेल्या तक्रारींकडे विविध विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत होते. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचा ओघ वाढत होता. याची दखल महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी घेतली.
सर्व विभाग प्रमुखांचा आढावा घेत तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याची सूचना दिली. त्यानुसार सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता सारथीवरील तक्रारींचा त्वरीत निपटारा सुरू केल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सारथीवरील तक्रारींचा अधिकाऱ्यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसून येत आहे.



