पिंपरी : शिंदे सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य केल्यानंतर माध्यमांसमोर माफी मागितली. मात्र, महिलेचा अवमान करणाऱ्या सत्तार यांचा माफीनामा नको राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष कविता आल्हाट यांनी केली आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी माफी नको राजीनामा द्यावा. यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अवताडे साहेब यांच्याकडे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करत निवेदन दिले. यावेळी कविता खराडे , मनीषा गटकळ, संगीता कोकणे,सुनीता अडसुळे , प्रफुल्ला मोतीलिग सुप्रिया सोलांकुरे , मिरा कदम, सरिता झिब्रे , सुनीता आल्हाट, स्मिता पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्याना सत्तेचा माज आला आहे. पक्षाशी गद्दारी करून सत्तेवर आलेले अब्दुल सत्तार यांनी आपल्या मुलांसाठी टीईटी घोटाळा केला. महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का? असे विचारणारे अब्दुल सत्तार , महाराष्ट्रातील राजकारणातील एक प्रतिष्ठित नेत्या आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे अब्दुल सत्तार यांना सत्तेचा माज आला आहे. हा सत्तेचा माज येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता निश्चित उतरवेल. त्याच्या बेताल वक्तव्य केल्याने त्याच्या विरोधात महिला वर्गातून विरोधात लाट उसळली. त्याच्या भीतीने त्यांना माफी मागण्याचे ढोंग केले. मात्र सत्तार यांनी माफीनामा नाही तर राजीनामा द्यावा असे कविता आल्हाट यांनी म्हटले आहे.




