मुंबई : खासदार संसदरत्न श्रीमती सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्याच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मागणी केली आहे.

यावेळी आमदार डॉ. मनीषाताई कायंदे, शिवसेनेचे अनेक महिला कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण, पुणे महिला शहराध्यक्षा वैशाली नागवडे, निर्मला प्रभावळकर, पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्षा. प्रा.सौ. कविता आल्हाट, निरीक्षक शितल हगवणे व अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
तसेच मंत्री गुलाबराव पाटील, रवींद्र चव्हाण यांना महिलांविषयी अपमानास्पद बोलण्या संदर्भात राज्यपालांना महाविकास महिला आघाडीच्या वतीने निवेदन दिले आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज , शाहू फुले,आंबेडकर अशा थोर महामानवाच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे चालत आहे. या महापुरुषांनी स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र आत्ताच्या लोकप्रतिनिधीना सत्तेची मस्ती चढली आहे. त्याच्याकडून प्रत्येक वेळेस स्त्रियांचा अपमान केला होत आहे. महाराष्ट्रात हे खपऊन घेतले जाणार नाही.
त्यामुळे आम्हाला अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर माफी नको त्यांचा राजीनामाच हवा आहे. आणि तो त्वरित घ्यावा असे निवेदाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. अन्यथा महाविकास आघाडी रस्त्यावर उतरून महिलांचा उपमान करणाऱ्या नेत्याविरोधात जन आंदोलन करतील असा इशारा यावेळी वतीने देण्यात आला.




