पिंपळे सौदागर : विश्वगुरू इन्फोटेक इंडियाचे MD & CEO राजेंद्र विठ्ठल गांगर्डे यांना इंडो अमेरिकन लीडरशिप पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार न्यूयॉर्क (अमेरिका) येथील भारतीय वाणिज्य दुतावासात माजी राजदूत फ्रँक विन्सर व केनेथ जस्टर, भारताचे महावाणिज्य दूत, (न्यूयॉर्क दुतावास) रणधीर जयस्वाल, आयएसीसी अध्यक्ष कपिल कौल यांच्या हस्ते देण्यात आला.
या पुरस्काराबद्दल राजेंद्र गांगर्डे यांचा सत्कार पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी करत त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. यावेळी गांगर्डे परिवार आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

पिंपळे सौदागर येथील रहिवासी असलेले राजेंद्र विठ्ठल गांगर्डे यांची विश्वगुरु इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही मुख्यत्वे व्यवसाय करत आहे. त्याचप्रमाणे वेब डेव्हलपमेंट आणि मार्केटिंग सेवा, कॉम्प्युटर आणि मोबाइल अॅप्स डेव्हलपमेंट, इंटरनेट मार्केटिंग आणि प्रमोशन, ग्राफिक डिझाइन आणि अॅनिमेशन सर्व्हिसेस, कॉम्प्युटर आणि मोबाइल सॉफ्टवेअर्स आणि अॅप्स मार्केट वर्टिकल यामध्ये सर्वाधिक सेवा व्यवसायात काम करत आहे. त्यांना 3 नोव्हेंबर रोजी इंडो अमेरिकन लीडरशिप पुरस्कार 2022 यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याच्या या कार्याची दखल घेत स्थानिक नगरसेवक नाना काटे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.



